For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभय सिंग, अनाहत सिंग वर्षातील सर्वोत्तम स्क्वॅशपटू

06:07 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभय सिंग  अनाहत सिंग वर्षातील सर्वोत्तम स्क्वॅशपटू
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे जागतिक दर्जाचे स्क्वॅशपटू अभय सिंग आणि अनाहत सिंग यांची 2025 सालातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला स्क्वॅशपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर स्क्वॅशपटूंची निवड आशियाई स्क्वॅश फेडरेशनने केली आहे.

2025 मध्ये इजिप्त येथे झालेल्या विश्व कनिष्ठ सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले होते. भारताच्या या विजेत्या मुलांच्या संघामध्ये अभय सिंगचा समावेश होता. जागतिक स्क्वॅशपटूंच्या मानांकनात अभय सिंग सध्या 25 व्या स्थानावर आहे. त्याने आपल्या अल्पशा स्क्वॅश कारकिर्दीत अनेक महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविली आहेत. आशियाई स्पर्धेत त्याने बऱ्याचवेळा तसेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील तो विजेता आहे. तसेच गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश होता.

Advertisement

भारताची महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंग सध्या जागतिक महिला स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत 20 व्या स्थानावर आहे. तिने अनेकवेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदके मिळविली आहेत. कैरोत 2025 साली झालेल्या विश्व कनिष्ठांच्या स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. तसेच विश्वचषक मिश्ा़dर सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये तिचा समावेश होता. यापूर्वी म्हणजे 2022 साली आशियाई स्क्वॅश फेडरेशनने घोषित केलेल्या वार्षिक पुरस्कार स्क्वॅशपटूंच्या यादीमध्ये भारताच्या सौरभ घोषाल आणि ज्योश्ना चिन्नाप्पा यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या विभागातील सर्वोत्तम स्क्वॅशपटूंचा बहुमान मिळविला होता.

Advertisement
Tags :

.