काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभय मालवणकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
नगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य यावे यासाठी पक्षात आता फेरबदल करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी महेंद्र सांगेलकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अभय मालवणकर यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष. गणेश पाटील यांच्या पत्राने निवड करण्यात आली आहे . प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी हे पत्र पाठवले आहे . श्री मालवणकर हे गेली वीस वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मालवणकर हे सह्याद्री पट्ट्यातील असून पूर्वीपासून काँग्रेसचे मतदार व कार्यकर्ते या पट्ट्यात मोठ्या संख्येने आहेत . त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी अभिनंदन केले आहे.श्री सांगेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.