For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News : भाषेच्या सीमा ओलांडत दक्षिणात्य महिलांची पंढरपुरात अभंग सेवा

06:35 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur news   भाषेच्या सीमा ओलांडत दक्षिणात्य महिलांची पंढरपुरात अभंग सेवा
Advertisement

                            सावळ्या विठुरायासाठी दाक्षिणात्य महिलांचे सुरेल अभंग गायन

Advertisement

पंढरपूर : मनात उत्कट भाव असतील तर भाषेचे बंधन कधीच आडवे येत नाही. सावळ्या विठुरायाच्या ओढीने चक्क दाक्षिणात्य महिला भाविकांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभंग गायन, भक्तिगीते सादर करून मंत्रमुग्ध केले.या महिलांना मार्गदर्शिका गायत्री अय्यर आणि राजेश्वरी श्रीनिवासन यांनी अभंग गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. अभंग गायन, भक्तिगीते यांची आवड आणि सतत केलेला सराव त्यांनी पाच वर्षे केला आहे. त्यामुळे दक्षिणात्य महिला भाविकांनी बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत सादर करण्यात आला.

भारतातील विविध कानाकोपऱ्यात असलेल्या शहरातील या महिला भाविकांनी ऑनलाईन शिक्षण घेतले असून निवडक महिलांनी आज साक्षातभाषांचे बंधन तोडून अवीट अभंगवाणी
बेंगलोर, चेन्नई, पुणे, ठाणे येथील महिलांचा सहभाग परब्रह्म श्री विठ्ठल रुक्मिणी समोर आपली कला सादर करून भक्ती प्रकट केली. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, क्षेत्र विठ्ठल देह विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कानडा राजा पंढरीचा, धरिला पंढरीचा चोर, अशी विविध भक्तिगीते सादर करण्यात आली.

Advertisement

पुणे येथील कांची शंकराचार्य मठ येथील या ३२ महिला शिष्य गणांनी कला सादर करून उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले. बेंगलोर, चेन्नई, पुणे, ठाणे येथील या महिला होत्या. संगीत विशारद गायत्री अय्यर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे दोन तास कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Advertisement
Tags :

.