अब्दुल्ला आझम यांची 7 वर्षांची शिक्षा रद्द
06:28 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
दोन पासपोर्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाचा मोठा दिलासा
Advertisement
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांचा पुत्र माजी आमदार अब्दुल्ला आझम यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. खासदार-आमदार सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी दोन पासपोर्ट प्रकरणातील अब्दुल्ला आझम यांच्या अपिलावर आपला निकाल देताना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा रद्द केली. यापूर्वी खासदार-आमदार दंडाधिकारी न्यायालयाने अब्दुल्ला आझम यांना दोन पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता सत्र न्यायालयाचा हा निर्णय अब्दुल्ला आझम यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तथापि, इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यामुळे अब्दुल्ला आझम यांची तुरुंगातून तात्काळ सुटका होणार नाही, असे उघड झाले आहे.
Advertisement
Advertisement