Solapur News : दक्षिण सोलापूरातील औजचे प्रगतिशील शेतकरी अब्दुलकादर बडेजागीरदार यांनी केली धवलक्रांती
कोरोनानंतर परदेशी शिक्षण घेणाऱ्या तरुणाने शेतीत केली प्रगती
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर औज( मंद्रूप ) येथील प्रगतिशील शेतकरी अब्दुलकादर बडेजागीरदार यांनी 50 पेक्षा जास्त मुर्रा जातीच्या म्हशी आणून तालुक्यात धवलक्रांती केली असून या प्रगतीचा आजच्या तरुणासमोर आदर्श ठेवला आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन उच्चशिक्षित बनलेल्या पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या या तरुणाने गावाकडे येऊन कोरोनानंतर शेतीत केली प्रगती केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या गावांमध्ये ऊस पिकाबरोबरच अन्य पिकांमध्ये देखील भरघोस प्रगती साधली आहे. एक आवड म्हणून त्यांनी धवल क्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामधून अनेक जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आधुनिक पद्धतीने एक उद्योग व्यवसाय करून शेतीमध्ये जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले आहेत. यातून शेणखतांमधून बायोगॅस निर्मितीचा देखील प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
औज ( मंद्रूप ) येथील बडेजागीरदार यांनी कुठल्याही प्रकारचा शासकीय अनुदान न घेता स्वतंत्र पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था असलेले वातानुकूलित असे अत्याधुनिक जनावरांचा गोठा उभारण्यात आला आहे. हा गोठा स्वखर्चाने एक शेतकऱ्यांसमोर व तरुणांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.