कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कराचीत हाफिज सईदच्या निकटवर्तीयाची हत्या

06:22 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘तोयबा’च्या साम्राज्याला दुसरा मोठा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तानमध्ये एकामागून एक अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत असून त्यामध्ये आता हाफिज सईदच्या आणखी एका निकटवर्तियाची कराचीत हत्या करण्यात आली. लष्कर-ए-तोयबासाठी निधी जमा करणाऱ्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हाफिज सईद हा भारताचा कट्टर दुश्मन असून भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. सध्या त्याच्या निकटवर्तियांची एकामागून एक हत्या पेली जात असून सईदसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. हल्ला करणारा व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

हाफिज सईदचा निकटवर्तीय अब्दुल रहमानवर हल्ला झाला असताना त्याच्यासोबत त्याचे वडील आणि इतर काही लोक होते. या हल्ल्यात त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले. तर अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल रहमान हा अहल-ए-सुन्नत वाल जमातचा स्थानिक नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कराचीत लष्कर-ए-तोयबासाठी निधी गोळा करत होता.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे. एकीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तेहरीक-ए-तालिबान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी  एकामागून एक मारले जात आहेत. अब्दुल रहमानच्या आधी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ कटल सिंधी याची पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नदीम हा सुद्धा हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात होता. काश्मीरमधील पुंछ, राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article