महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हल्दानी हिंसेप्रकरणी अब्दुल मोईदला अटक

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /हल्दानी

Advertisement

उत्तराखंडच्या हल्दानीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसेप्रकरणी उत्तराखंड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हिंसेचा सूत्रधार अब्दुल मलिकचा पुत्र अब्दुल मोईदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये उत्तराखंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अब्दुल मोईदला यापूर्वी वाँटेड घोषित करण्यात आले होते. बनभुलपुरा येथील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असताना जमावाने पोलीस आणि प्रशासनाच्या पथकावर मोठा हल्ला केला होता. हिंसेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणी दंगलखोरांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता. हल्दानीत संचारबंदी लागू करून स्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. हल्दानी हिंसेचा मुख्य आरोपी अब्दुल मलिकला शनिवारी दिल्लीतून अटक करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article