For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अब्दुल करीम टुंडा निर्दोष

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अब्दुल करीम टुंडा निर्दोष
Advertisement

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी : अजमेर टाडा न्यायालयाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /अजमेर

1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने अन्य दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, अब्दुल करीम टुंडा याची सर्व आरोपातून निर्दोष सुटला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाला पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत, असे याचिकाकर्त्याचे वकील शफकत सुलतानी यांनी अजमेरमध्ये सांगितले. दरम्यान, टुंडाची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी बाबरी मशीद पाडल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील अनेक गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले. या प्रकरणात अब्दुल करीम टुंडावर दहशत पसरवल्याचा आरोप होता. देशातील कोटा, सुरत, कानपूर, सिकंदराबाद, मुंबई आणि लखनऊ या रेल्वेगाड्यांमध्ये हे स्फोट झाले. मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या या रेल्वे बॉम्बस्फोटांनी देशाला हादरवून सोडले. अतिरेकी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत विविध शहरांमधील सर्व प्रकरणे एकत्रित करून विशेष न्यायालयाने सुनावणी केली. तपासाची जबाबदारी केंद्रीय एजन्सी सीबीआयकडे होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनी सांगितले.

Advertisement

टुंडा वयाच्या 40 व्या वषी दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाला होता. याआधी तो सुताराचे काम करत असे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर तो पहिल्यांदाच प्रकाशझोतात आला होता. दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जाणारा टुंडा त्याच्या बॉम्ब बनवण्याच्या कौशल्यासाठी ‘डॉ बॉम्ब’ म्हणून ओळखला जात होता. बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात त्याचा डावा हात गमवावा लागला. टुंडावर लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद आणि बब्बर खालसा या दहशतवादी संघटनांसोबत काम केल्याचा आरोप आहे. 2013 मध्ये त्याला भारत-नेपाळ सीमेजवळ उत्तराखंडमधील बनबासा येथे अटक करण्यात आली होती. चार वर्षांनंतर 1996 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात हरियाणाच्या न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अब्दुल करीम टुंडा हा भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील 20 दहशतवाद्यांपैकी एक होता ज्यांना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सरकारकडे सोपवण्याची मागणी केली होती. या यादीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश असून टुंडाचे नावही त्यात समाविष्ट होते. टुंडाचा अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये सहभाग होता, पण 2016 मध्ये त्याला दिल्ली न्यायालयातून चार प्रकरणांमध्ये क्लीनचिट मिळाली होती. तथापि, 1996 च्या सोनीपत बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला दोषी ठरवून जन्मठेप आणि 1 लाख ऊपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तो सध्या तुऊंगात शिक्षा भोगत आहे.

Advertisement
Tags :

.