कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अबब 11 कोटीचा मासा

06:11 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या वर्षात जपानच्या टोकियो येथील मासळीबाजारात झालेल्या लिलावात विक्रम नोंदविला गेला आहे. या मासळीबाजारात घडलेला प्रकार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. टोकियोच्या मासळीबाजारात ब्ल्यूफिन टुना माशाचा लिलाव झाला. हा मासा 11 कोटी रुपयांमध्ये विकला गेला आहे. सोशल मीडियावर याची छायाचित्रे आता व्हायरल होत आहेत.

Advertisement

Advertisement

हा काही छोटा मासा नव्हता तर 276 किलो वजनाचा ब्ल्यूफिन टूना मासा होता. याचा लिलाव 207 दशलक्ष येन म्हणजेच 11 कोटी रुपयांमध्ये झाला आहे. ओनोडेरा ग्रूपच्या मिशेलिन-तारांतिक सुशी रेस्टॉरंटने हा मासा खरेदी केला आहे. हा मासा एका मोटरसायकलच्या आकार आणि वजनाइतका आहे. ब्ल्यूफिन टूना मासा स्वत:च्या वेगासाठी ओळखला जातो. या माशाचे सरासरी आयुष्य 40 वर्षे असते आणि हा मासा समुद्रात लांब अन् खोलवर संचार करत असतो. 1999 मध्ये नोंद आकडेवारीनुसार ओपनिंग ईयर लिलावात टोकियो फिश मार्केटमध्ये  या माशाला दुसरी सर्वात मोठी किंमत मिळाली. ओनडेरा ग्रूपच्या सुशी रेस्टॉरंटला मिशेलिन यांनी सुरू केले होते. टूना मासा लोक खातील आणि त्यांना हे नवे वर्ष अत्यंत चांगले वाटेल अशी आम्ही कामना करतो, असे ओनडेराचे शिंजी नगाओ यांनी म्हटले आहे. मागील वर्षी देखील ओनडेरा ग्रूपने 117 दशलक्ष येनचा टूना मासा खरेदी केला होता. 2019 मध्ये 278 किलो वजनाच्या ब्ल्यूफिन फिशची किंमत 336.6 दशलक्ष येन होती.

2019 नंतर टुना माशाच्या विक्रीत मोठी घट झाली होती. कोरोना महामारीमुळे रेस्टॉरंट बंद होते आणि लोक खाण्यासाठी बाहेर पडत नसल्याने टूना माशाची मागणी कमी झाली होती.  परंतु आता मासळी बाजारात पुन्हा विक्रीला वेग आला असून जपानचा नववर्षातील लिलाव पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article