माजी जि. प. अध्यक्ष आबा घोसाळेंचा ठाकरे गटाला रामराम! शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आपल्या कार्यकर्त्यांसह 5 ऑक्टोबर पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिराया राजकारणातील एक मातब्बर उबाठातील नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्यी जोरदार चर्चा सुरू होती. जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांया घरी गणेशोत्सवात पालकमंत्री उदय सामंत यांनी गणरायाया दर्शनाला भेट देखील दिली होती. त्यावेळी घरी दर्शनासाठी आलेल्या मंत्री सामंत यों घोसाळे कुटुंबियांनी स्वागत केले होते. त्यामुळे येथील साऱया राजकीय वर्तुळो लक्ष लागलेले होते. शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांया उपस्थितीत आबा घोसाळे यांनी अखेर प्रवेश केला. त्यांया पक्षप्रवेशानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत त्यांनी रत्नागिरीत निवडून आणली. ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.
या झालेल्या पक्ष प्रवेशाविषयी आबा घोसाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. येत्या विधानसभेला तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार, असा विश्वास आबा घोसाळे यांनी व्यक्त केला. घोसाळे यांया या पक्षप्रवेशाने नाणे जि.प.गटातील उबाठाया बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडणार आहे. कारण हय़ा उबाठाया बालेकिल्ल्यातील खंदे नेतृत्व म्हणून आंबा घोसाळे यांयाकडे पाहिले जात होते.