आस्था ग्रृप मालवण तर्फे 25 जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा
मालवण/प्रतिनिधी
आस्था ग्रुप मालवण तर्फे दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेची सुरुवात सागरी महामार्ग कोळंब येथून होणार असून .ही स्पर्धा पाचवी ते सातवी लहान गट आणि आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटात होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत पारितोषिक लहान गटात पाचवी ते सातवीतील विजेत्या मुली आणि मुलांसाठी प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रुपये 1000 व चषक ,द्वितीय क्रमांकास रोख रुपये 700 व चषक , तृतीय क्रमांकास रोख रुपये 500 व चषक त्याचप्रमाणे मोठ्या गटात आठवी ते दहावीतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रुपये 1500 व चषक , द्वितीय क्रमांकास रोख रुपये 1000 व चषक , तृतीय क्रमांकास रोख रुपये 700 व चषक असे पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे .नावनोंदणीची अंतिम तारीख 23 जानेवारी 2025 पर्यंत असून संपर्क सचिव मनोज चव्हाण , स्पर्धा प्रमुख बंटी केनवडेकर.तसेच सौगंधराज बांदेकर 8975727106 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .