For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोस - दांडेली माऊली मतिमंद व कर्णबधीर विद्यालयाला ५० हजाराचा धनादेश

03:49 PM May 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आरोस   दांडेली माऊली मतिमंद व कर्णबधीर विद्यालयाला ५० हजाराचा धनादेश
Advertisement

संस्कार फाउंडेशनच्या उमेश सावंत यांची सामाजिक बांधिलकी

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
असनिये गावचे सुपुत्र मुंबईस्थित उमेश महादेव सावंत यांनी स्थापन केलेल्या संस्कार फाउंडेशन मार्फत आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयाला ५० हजाराचा धनादेश उपलब्ध केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धनादेश माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत व विशेष शिक्षक प्राणेश नाईक यांच्याकडे प्रदान करण्यात आला.असनिये श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असनिये माजी सरपंच एम. डी. सावंत, सौ सुजाता सावंत, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश सावंत, अँड सचिन सावंत, बंटी सावंत, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्हि एम नाईक, माजी सभापती भगवान देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार नाईक, सदस्य सुभाष बोंद्रे, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, शांताराम सावंत, राजाराम उर्फ बाळू सावंत, अण्णा गावडे, गोविंद मोर्ये, शांताराम असनकर, आना गवस, प्रगतशील बागायतदार जनार्दन सावंत, डॉ तुषार भोसले, सत्यजित धारणकर, मेघेंद्र देसाई, श्रीराम कोटकर, घारपीचे विजय गावकर, अँड चिंदरकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, वाफोलीचे विनेश गवस, आबा तळेकर, प्रशांत बांदेकर, गीता सावंत, यशवंत सावंत, बबी सावंत आदी उपस्थित होते. संस्कार फाउंडेशनच्यावतीने यापूर्वीही सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक गरजू व्यक्ती व सेवाभावी संस्थांना मदत करण्यात आलेली आहे. असनिये गावचे माजी सरपंच एमडी सावंत यांचे सुपुत्र असलेले संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश सावंत यांनी माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी या विद्यालयाच्यावतीने विनंती करण्यात आली होती. या कार्यक्रमात माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी विद्यालयाला आर्थिक मदत केल्याबद्दल संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश सावंत यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असनिये हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत, सूत्रसंचालन सिद्धेश परब तर आभार उमेश सावंत यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.