For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आप’चे पुढील टार्गेट ‘मी’ असणार

12:20 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आप’चे पुढील टार्गेट ‘मी’ असणार
Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राघव चड्ढांनी घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील होणाऱ्या खासदारांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत आप सरकारकडून स्वत:विरोधात होत असलेल्या कारवाईवर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज्यसभा खासदारांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. पंजाब सरकार कशाप्रकारे ‘आप’मधून बाहेर पडलेल्या खासदारांच्या विरोधात सूडाच्या राजकारणासाठी सरकारी व्यवस्थेचा वापर करतेय हे आम्ही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले आहे. पंजाब पोलिसांच्या मदतीने आप कार्यकर्त्यांनी हरभजन सिंह यांच्या निवासस्थानाबहेर ‘गद्दार’ असे लिहिले. यानंतर पंजाबमध्ये पद्मश्री राजेंद्र गुप्ता यांच्या कारखान्याची नळजोडणी तोडण्यात आली. आता ‘आप’चे पुढील टार्गेट मी ठरेन असा दावा खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे.

Advertisement

‘आप’ने संदीप पाठक यांच्य विरोधात खोट्या आरोपांखाली एफआयआर नोंदविले आणि त्यांना अटक केली जाईल अशी अफवा प्रसारमाध्यमांद्वारे पसरविली. आम आदमी पक्षाने दक्षता बोर्ड अणि प्रदूषण विभागच्या मदतीने सूडाचा एक धोकादायक खेळ सुरू केला असून त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील असे सांगू इच्छितो असे चड्ढा यांनी सांगितले आहे.

प्रतिमा मलीन करण्याचा डाव

‘आप’चे पुढील टार्गेट मी ठरेन. ते माझ्यावरही कारवाई करणार आहेत. आम्हा सर्वांची प्रतिमा मलीन करण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे. पंजाब सरकारने सोशल मीडियावर आम्हाला धमकाविण्यासाठी अनेक एजेन्सींना काम दिले आहे. आम आदमी पक्ष हे सर्व पंजाब सरकारच्या निधीतून करत आहे. याचमुळे आम आदमी पक्ष भ्रष्ट आणि तडजोडवादी लोकांच्यात हातात अडकून पडल्याचा आरोप केला होता असे चड्ढा यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.