पंजाब विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ‘आप’चे उमेदवार जाहीर
06:17 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ चंदीगड
Advertisement
पंजाबच्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केले आडहेत. आपने डेरा बाबक नानक मतदारसंघात गुरदीप सिंह रंधावा, छब्बेवाल मतदारसघात ईशान छब्बेवाल, गिद्दडबाहा येथे हरदीप सिंह डिंपी ढिल्लो आणि बरनाला मतदारसंघात हरिंदर सिंह ढालीवाल यांना उमेदवारी दिली आहे.
पंजाबच्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या चारही मतदारसंघाचे आमदार राहिलेले नेते हे लोकसभेत निवडून आले आहेत. याचमुळे या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. 25 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे. तर 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर आहे. तर 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Advertisement
Advertisement