दिल्ली निवडणुकीसाठी ‘आप’चे प्रचारगीत सादर
06:39 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी स्वत:चे प्रचारगीत ‘फिर लाएंगे केजरीवाल’ सादर केले आहे. प्रचारगीताच्या सादरीकरणावेळी व्यासपीठावर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी, मंत्री गोपाल राय समवेत आपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. आमचे प्रचारगीत हे भाजप नेत्यांनाही पसंत पडणार आहे. भाजप नेते स्वत:च्या घरात खोली बंद करत या गाण्यावर नाचू शकतात, असे म्हणत केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 2015 मध्ये केजरीवाल सॉन्ग सादर करण्यात आल्यावर ते सर्वत्र वाजत होते. कुठल्याही विवाह सोहळ्यात पक्षाचे प्रचारगीत वाजत असल्याचा प्रकार केवळ दिल्लीत घडला होता. तर नवे प्रचारगीत पुन्हा एकदा दिल्लीवासीयांमध्ये लोकप्रिय होईल, असा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
Advertisement
Advertisement