For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तपास यंत्रणांवर ‘आप’चा हल्लाबोल

06:09 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
तपास यंत्रणांवर ‘आप’चा हल्लाबोल
Advertisement

ईडी, सीबीआयच्या ‘राजकारणा’ने सारा देश खजील : निवडणुकीत जनताच उत्तर देईल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांसारख्या केंद्रीय एजन्सींच्या ‘राजकारणा’ची संपूर्ण देशाला लाज वाटत असल्याचा हल्लाबोल आम आदमी पार्टीने शुक्रवारी केला. तपास यंत्रणांच्या साथीने सुरू असलेल्या या कारनाम्यांना जनता येत्या निवडणुकीत उत्तर देईल, असे ‘आप’च्या नेत्यांनी म्हटले आहे. ‘आप’ नेत्याच्या आरोपांवर भाजपकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement

भाजपने गेल्या 10 वर्षांतील ‘सर्वात मोठी राजकीय वॉशिंग मशिन’ विकसित केली असून त्यामध्ये ते भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत असलेल्या व्यापारी आणि राजकारण्यांकडून ‘पोल डोनेशन’ गोळा करतात, असा आरोप ‘आप’चे प्रवक्ते जस्मिन शाह यांनी पत्रकार परिषदेत केला. अनेक खटल्यांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून क्लीनचिट मिळाल्याचे शाह म्हणाले. पटेल यांना क्लीनचिट देण्यात आलेले प्रकरण नागरी विमान वाहतूक मंत्री असताना इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणाशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सीबीआयच्या आरोपपत्र आणि पॅगच्या अहवालानुसार या प्रकरणात मोठा घोटाळा झाला होता आणि सरकारी तिजोरीचे 840 कोटी ऊपयांचे नुकसान झाले होते. पटेल यांना एकापाठोपाठ एक समन्स पाठवण्यात आले. मात्र, 2023 मध्ये महाराष्ट्रात अजित पवार गट भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये सामील झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समन्स आणि मालमत्ता जप्ती थांबवण्याबरोबरच कोणतेही आरोपपत्र दाखल केले गेले नाही. संपूर्ण तपास स्थगित करण्यात आल्याचा दावा ‘आप’ने केला.

महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय नेते छगन भुजबळ यांच्याबाबतही असाच प्रकार घडला असून सध्या त्यांच्याविरोधातील ईडी कारवाई बंद असल्याचे शाह म्हणाले. याविरोधात दुसरीकडे, दोन वर्षांपासून ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू असलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे किंवा एका पैशाच्या चुकीचे पुरावे सापडले नसतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह चार आप नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ईडी आणि सीबीआयकडून अशा पद्धतीने राजकारण केले जात असून हा सर्व प्रकार संपूर्ण देश पाहत असल्याचे ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.