For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’ची 1 सप्टेंबरपासून ‘आमदार आपके द्वार’ मोहीम

06:38 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’ची 1 सप्टेंबरपासून  ‘आमदार आपके द्वार’ मोहीम
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पार्टी 1 सप्टेंबरपासून ‘आप का आमदार, आपके द्वार’ मोहीम सुरू करणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोमवारी सांगितले. मनीष सिसोदिया यांच्या पदयात्रेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही 1 सप्टेंबरपासून दुसरी मोहीम सुरू करत आहोत. आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असे ते पुढे म्हणाले.

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यासह संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना न्यायालयातून जामीन मिळाला आहे, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अजूनही तुऊंगात आहेत. सिसोदिया आणि संजय सिंह यांची तुऊंगातून सुटका झाल्यानंतर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. तुऊंगातून सुटल्यानंतर मनीष सिसोदिया सातत्याने दिल्लीतील विविध भागात पायी पदयात्रा करत जनतेशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. भाजपने यासाठी मास्टरप्लॅनही तयार केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील तीन दिग्गज नेत्यांना विशेष सूचना दिल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Tags :

.