For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजगाव सहकारी सोसायटीत उद्या आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ

04:16 PM Jan 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आजगाव सहकारी सोसायटीत उद्या आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

आजगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मध्ये उद्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी१० वाजता आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर , माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले , जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब , सभापती प्रमोद गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संस्थेचे माजी चेअरमन यांचा सत्कार , संस्था कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी तसेच पारंपारिक शेती व्यवसाय व दुग्ध व्यवसाय जोपासणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे . कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी ,संचालक विद्याधर परब, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब , सहाय्यक उपसंचालक माणिक सांगळे , सहाय्यक निबंधक सुजय कदम , सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे , आजगाव सरपंच जयश्री सौदागर , भोमवाडी सरपंच अनुराधा वराडकर , धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, तिरोडा सरपंच संदेश केरकर आधी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ ते ६ हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री ७ वाजता आजगावकर पारंपारिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग भोमवाडी समोरील पठांगण ग्रामपंचायत येथे होणार आहे , तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन एकनाथ नारोजी व्हाईस चेअरमन सदानंद गवस यांनी केले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.