For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोटनिवडणुकांमध्ये ‘आप’ ला यश

06:16 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोटनिवडणुकांमध्ये ‘आप’ ला यश
Advertisement

चार राज्यांमधील पाच विधानसभा जागांचा निकाल जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चार राज्यांच्या विधानसभांच्या पाच पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने मोठे यश मिळविले आहे. या पक्षाने गुजरातमधील विसवदर आणि पंजाबमधील लुधियाना  (पश्चिम) अशा दोन मतदारसंघांमध्ये या पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. केरळमधील निलांबर मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला असून पश्चिम बंगालच्या कालीगंजमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाने गुजरातमधील काडी मतदारसंघात यश प्राप्त केले आहे.

Advertisement

आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी गुजरातच्या विसवदर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव करुन 17 हजार 554 मतांनी विजया संपादन केला. याच पक्षाचे उमेदवार संजीव अरोरा यांनी पंजाबमधील लुधियाना (पश्चिम) मतदारसंघात काँग्रेसचे भारत भूषण साहू यांना 10 हजार 673 मतांनी पराभूत केले. गुजरातचा काडी मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने स्वत:कडे राखला आहे. या पक्षाचे उमेदवार राजेंद्रकुमार दानेश्वर चावडा यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांचा 39 हजार 452 मतांनी पराभूत केले.

केरळमध्ये काँग्रेस विजयी

केरळच्या निलांबर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आर्यदन शौकत यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार एम स्वराज यांचा 11 हजार 77 मतांनी पराभव केला आहे. तर पश्चिम बंगालच्या कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलीफा अहमद यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशीश घोष यांचा 50 हजार 49 मतांनी पराभव केला आहे. गुजरातच्या विसवदर मतदारसंघातील पराभव भारतीय जनता पक्षासाठी धक्का मानण्यात येत आहे. तर केरळमधील पराभव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी धोक्याची घंटा ठरला आहे.

Advertisement
Tags :

.