For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक
Advertisement

दिल्ली वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमानतुल्ला खान गुऊवारी (18 एप्रिल) ईडीसमोर हजर झाले. ईडी कार्यालयात त्याची सुमारे साडेनऊ तास चौकशी झाल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी 32 जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या आहेत. दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही आप आमदारावर आहे. त्यांच्यावरील आरोपांनंतर तपासादरम्यान अमानतुल्लाच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरून रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. छाप्यादरम्यान अमानतुल्लाच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी एक डायरीही सापडली असून त्यात अमानतुल्लाने देश-विदेशात केलेल्या कोट्यावधी ऊपयांच्या व्यवहारांचा उल्लेख आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारच्या अडचणी वाढत आहेत. प्रथम उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ताब्यात घेतले. आता आणखी एका आप आमदाराच्या अटकेमुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. अमानतुल्ला खान हे ओखलाचे आमदार आहेत. 2020 मध्ये आम आदमी पार्टीने पुन्हा ओखलामधून अमानतुल्ला खान यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकली. अमानतुल्ला खान अनेकदा वादात सापडले आहेत. ओखला विधानसभेत ते अनेकदा विरोधी पक्षांच्या निशाण्यावर होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.