For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागावाटपाबाबत आप-काँग्रेस चर्चा

06:13 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागावाटपाबाबत आप काँग्रेस चर्चा
Advertisement

पुढील बैठकीत मतदारसंघ व उमेदवार निश्चित होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात सोमवारी महत्त्वाची बैठक झाली. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणी करण्यासाठी पाठवले होते. त्यानुसार सोमवारी प्राथमिक बोलणी झाली असून पुढील बैठकीत संभाव्य मतदारसंघ आणि उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे.

Advertisement

अरविंद केजरीवाल यांनी आपले प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवले. अतिशय चांगल्या वातावरणात दोन ते अडीच तास चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस आघाडी समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी बैठकीनंतर दिली. ही चर्चा यापुढेही सुरू राहील. आम्ही काही दिवसांनी पुन्हा भेटणार असून पुढील बैठकीत जागावाटपाला अंतिम स्वरूप देऊ. काय चर्चा झाली यावर सविस्तर भाष्य करू शकत नाही. मात्र, भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-आपच्या नेत्यांमध्ये कोणत्या राज्यांबाबत चर्चा झाली याची माहितीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिली नाही. तथापि, दिल्ली, पंजाब, गुजरात आणि हरियाणा या चार राज्यांमधील स्थिती जाणून घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसकडेही जागा मागू शकते, असे संकेत आहेत.

Advertisement
Tags :

.