For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘आप’कडून लोकसभेसाठी पंजाबमधील 8 उमेदवार जाहीर!

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’कडून लोकसभेसाठी पंजाबमधील 8 उमेदवार जाहीर

चंदीगड :

Advertisement

आम आदमी पक्षाने पंजाबसाठी पहिली यादी जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपने एकूण 5 मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. याचबरोबर ‘आप’ने वर्तमान खासदार सुशील रिंकू यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. रिंकू हे जालंधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार असणार आहेत. तसेच मागील आठवड्यात आम आदमी पक्षात सामील झालेल्या गुरप्रीत सिंह जीपी यांना फतेहगढ साहब मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्तीय आणि प्रसिद्ध कलाकार करमजीत अनमोल यांना फरीदकोट मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. तर 5 मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. यात अमृतसर येथे कुलदीप सिंह धालीवाल उमेदवार असतील. संगरूरमध्ये गुरमीत सिंह मीत हेयर, पतियाळातून डॉक्टर बलवीर यांना पक्षाने संधी दिली. भटिंडा येथे गुरमीत सिंह खुडियां, खडूर साहबमध्ये लालजीत भुल्लर उमेदवार असतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.