For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Aamir Khan | आमिरची महिलांच्या बाबतीत निवड...'; सर्वांसमोर Kajol'ने मारलेला 'तो' टोमणा ऐकून आमिर खान लाजला!

04:54 PM Jun 14, 2026 IST | NEETA POTDAR
aamir khan   आमिरची महिलांच्या बाबतीत निवड      सर्वांसमोर kajol ने मारलेला  तो  टोमणा ऐकून आमिर खान लाजला
Advertisement

मुंबई - बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे... अशातच त्याचा जुही चावला आणि काजोलचा एक व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात आमिर खानची काजोल आणि जुहीनं गंमतीनं चेष्टा करत आहे.. ही तीन तिकडी एकत्र आली निमित्त ठरले लगान’ या चित्रपटाचे..
‘लगान’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.निमित्तानं मुंबईत एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमिर खान, सलमान खान, जावेद अख्तर, काजोल आणि जुही चावला यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली...यावेळी दोघींनीही अमिरची फिरकी घेतली..

Advertisement

काजोल आणि जुहीनं सर्वांसमोर आमिर खानला टोमणा मारला

या दोघींनाही अमिरबद्दलचा किस्सा विचारला असता, सुरुवात काजोलने केली, काजोल हसत म्हणाली की, आमिर खानच्या सिनेमाच्या निर्मितीनं त्याची उत्कृष्ट चित्रपट निवड सिद्ध झाली आहे. तिनं गंमतीनं असंही म्हटलं की, आमिर खानची महिलांच्या बाबतीत निवड चांगली आहे. काजोलची कमेंट ऐकून आमिर खान हसला आणि थोडासा लाजला.... यानंतर जूहीला अमिरबद्दल विचारले असता ती म्हणाली की, म्हटलं जर तिनं आमिरबद्दल बोलायला सुरुवात केली, तर संपूर्ण संध्याकाळच संपून जाईल. जुही हसून म्हणाली, 'बघा, माझ्यासोबत काम केलेले प्रत्येकजण कुठे पोहोचले आहेत.' सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी जुही आणि काजोलचं कौतुक केलं.

Advertisement

Advertisement
Tags :

.