बायोपिकमध्ये काम करणार अमीर खान
बिझनेस टायकूनची व्यक्तिरेखा साकारणार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणवून घेणारा अभिनेता आमिर खान याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. आमिरचा यापूर्वीचा अखेरचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. आता आमिर एका बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. आमिरने अश्वनीर ग्रोवरच्या बायोपिकला मंजुरी दिली आहे. बिझनेस आणि स्टार्टअप जगतात त्याच्या भूमिकेच्या कहाणीने अभिनेत्याला प्रभावित केले आहे. आमिरने ही कहाणी वाचली असून त्याला ती अत्यंत पसंत पडली आहे. याचमुळे तो हा चित्रपट करणार आहे. चित्रपट सध्या निर्मितीपूर्व स्थितीत आहे. अश्वनीर आजच्या प्रेक्षकांच्या दरम्यान अत्यंत लोकप्रिय आहे. याचमुळे हा चित्रपट त्याच्याशी अत्यंत मिळताजुळता असणार आहे.
अश्वनीर ग्रोवरची कहाणी त्याचे पुस्तक ‘दोगलापन : द हार्ड ट्रूथ अबाट लाइफ अँड स्टार्टअप्स’मध्ये मांडण्यात आली आहे. ‘प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी आणि तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या कथेचा लेखक राहुल मोदी या चित्रपटाचे दिग्दर्शन अन् निर्मिती करणार आहे. आमिर सध्या स्वत:चा पुत्र जुनैद खानचा आगामी चित्रपट एक दिनवरून चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खाननेच केली आहे. चित्रटात जुनैद सोबत साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शित होणार आहे.