For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आमिर खान

06:58 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुपरहिरोच्या  भूमिकेत दिसणार आमिर खान
Advertisement

साजिद अन् बाल्कीच्या चित्रपटात करणार काम

Advertisement

आमिर खान एका नव्या सुपरहीरो चित्रपटासाठी निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासोबत चर्चा करत आहे. हा चित्रपट सध्या प्रारंभिक टप्प्यात असून याच्या पटकथेवर काम सुरू आहे. आमिर खानला या प्रोजेक्टसाठी निवडण्यात आले असून त्यानेही याकरता रुची दाखविली आहे.

आगामी काही महिन्यांमध्ये याची कहाणी, संवाद आणि मुख्य पात्र तयार करण्यावर काम केले जाईल. हा चित्रपट व्यापक स्तरावर निर्माण करण्याची योजना असल्याने याचा लुक आणि प्रॉडक्शन डिझाइनवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

Advertisement

आमिर खान हा कुठलाही चित्रपट स्वीकारण्यापूर्वी त्याच्या पटकथेला वेळ देतो. कहाणी पूर्णपणे पसंत पडली तरच तो होकार देतो. अशास्थितीत चित्रपटावरून आमिर आणि निर्मात्यांदरम्यान सातत्याने चर्चा होत राहेत. आमिर आणि साजिद दीर्घकाळापासून मित्र आहेत, परंतु दोघांनी आतापर्यंत कुठल्याही चित्रपटासाठी एकत्र काम केलेले नाही.

तर आर. बाल्की हे वेगळया प्रकारच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘चिनी कम’, ‘पा’, ‘की अँड का’, ‘पॅडमॅन’ आणि ‘चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अशास्थितीत आमिरसोबत त्यांचा सुपरहीरो प्रोजेक्ट या धाटणीपेक्षा काहीसा वेगळा असू

शकतो.

Advertisement
Tags :

.