दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आळवेच्या चौगुले दांपत्याला निमंत्रण
उत्रे प्रतिनिधी
26जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या राष्ट्रीय परेडमध्ये उपस्थित राहण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील आळवे या छोट्या गावातील शेतकरी माजी उपसरपंच व केदारलिंग सूत गीरणीचे संचालक आनंदराव हिंदुराव चौगुले व माजी सरपंच सुनंदा आनंदराव चौगुले या दांपत्याला निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्लीतील पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या 'कर्तव्यपथ' प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शासनाद्वारे विशेष अतिथी म्हणून चौगुले दांपत्याची निवड झाली असल्याचे पत्र सहायक आयुक्त अ. मा. पाटील यांनी दिले आहे. या निवडीसाठी आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
हा तर सर्व आळवे ग्रामस्थांचा सन्मान माझ्यासारख्या छोट्या गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात सहकुटुंब हजर राहण्याचा बहुमान मिळाला आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा माझा नव्हे तर हा सर्व आळवे ग्रामस्थांचा सन्मान आहे.