पॅन-प्राप्तिकरसाठी आता आधार नोंदणी क्रमांक ठरणार अवैध
सुविधा 1 ऑक्टोबरपासून होणार बंद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येणाऱ्या ऑक्टोबरपासून पॅनकार्ड अर्ज किंवा प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार अर्ज क्रमांक स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी आधार क्रमांक दिला जाणार आहे. सरकारने म्हटले आहे की, आधार अर्जाच्या नावनोंदणी आयडीवर आधारित एकापेक्षा जास्त पॅन तयार केले जाऊ शकतात, त्यामुळे पॅनकार्ड नंबरचा गैरवापर होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2024 पासून हा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा 2017 पासून सुरु होती. परंतु सरकारचा असा विश्वास आहे की आधार क्रमांकाची व्याप्ती वाढत आहे त्यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे. आधार नोंदणी आयडी आधार क्रमांकापेक्षा वेगळा आहे. आधार क्रमांक हा 12-अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक आहे, जो भारतातील लोकांसाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. तर आधार नोंदणी आयडी (इआयडी) हा 14 अंकी क्रमांक आहे, जो आधार कार्डसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला दिला जातो.