For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधारकार्ड झाले अधिक महाग

06:37 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आधारकार्ड झाले अधिक महाग
Advertisement

पीव्हीसी कार्डसह अपडेट्ससाठी द्या जादा पैसे

Advertisement

नवी दिल्ली :

आधार कार्ड आता केवळ ओळखीचे साधन राहिलेले नाही. आता आधार हे बँकिंग, सरकारी योजना आणि इतर आवश्यक सेवांसाठी अनिवार्य झाले आहे. मात्र आधार कार्ड आता अधिक महाग होणार आहे. कारण पीव्हीसी कार्ड आणि अपडेट्ससाठी आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

Advertisement

ऑनलाइन अपडेट्स आणि शुल्कातील बदल

युआयडीएआयने आता नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखी माहिती ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. ही सेवा 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध आहे. नाव आणि पत्ता बदलण्याचे शुल्क 50 रुपयांवरून 75 रुपये करण्यात आले आहे, तर ऑनलाइन अपडेट्स 14 जून 2026 पर्यंत विनामूल्य राहतील. ऑफलाइन शुल्कामध्येही बदल करण्यात आले आहेत. फोटो अपडेटसाठी 125 रुपये, आधारच्या पुनर्मुद्रणासाठी 40 रुपये आकारले जातील. नवीन प्रणाली थेट युआयडीएआय डेटाबेसमधून माहितीची पडताळणी करेल.

पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय?

पीव्हीसी आधार कार्ड पॉलीविनाइल क्लोराईडपासून बनवलेले असते आणि ते लहान पाकिटात सहज मावेल अशा आकाराचे असते. यामध्ये क्यूआर कोड, होलोग्राम, मायक्रोटेक्स्ट आणि गिलॉच पॅटर्न यांसारखी अनेक सुरक्षा वैशिष्ट्यो समाविष्ट आहेत. यामुळे आधार कार्ड केवळ अधिक टिकाऊ बनत नाही, तर बनावट कार्डची शक्यताही कमी होते.

Advertisement
Tags :

.