For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यात घरगुती गॅसला आधार कार्ड लिंक डेडलाईन ठरतेय डोकेदुखी

11:49 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यात घरगुती गॅसला आधार कार्ड लिंक डेडलाईन ठरतेय डोकेदुखी
Advertisement

 उन्हात उभे राहावे लागल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल

Advertisement

फोंडा : फोंडा येथील घरगुती गॅस सिलींडरला केवायसी जोडणी करण्यासाठी सद्या 31 डिसेंबरची अंतिम मुदत असल्यामुळे गॅस एजन्सीधारकांच्या दुकानासमोर उन्हात तळमळत राहण्याची वेळ फोंडयातील ज्येष्ठ नागरिकांवर आलेली आहे. तीव्र उष्णतेत लांब रांगेत उभे ज्येष्ठ व महिलांना उभे राहावे लागत असून ग्राहकांना केवायसी प्रक्रियाच ऑनलाईन का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.  तिस्क-फोंडा येथील एका एलपीजी काऊंटवर सद्या ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गॅस बुक कोणाच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्याच माणसाचे आधार कार्ड व बॉयोमेट्रीक नोंदी जमा करण्याची प्रक्रिया सद्या फोंडा शहरात सुरू आहे. फोंडा शहरात कार्यरत असलेल्या भारत गॅस आणि एचपी गॅस एजन्सीमध्ये त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी गॅसधारकाने आपली बुकिंग पुस्तिकेसह आधार कार्ड घेऊन गर्दी करीत आहे. मात्र ही केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कडक उन्हात रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे तारंबाळ उडालेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने एलपीजी एजन्सींना अंतिम मुदत मागे घेण्याचे निर्देश द्यावे आणि ग्राहक जेव्हा आणि सिलिंडर रिफिलिंगसाठी बुक करतात तेव्हा प्रक्रिया पुर्ण करण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंती केली आहे. विविध सेवांसाठी आाधर लिंक करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची सक्ती का केली जाते. असा संतत्प सवाल काही नागरिकांनी केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.