For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधार कार्ड नव्हे लग्नाची पत्रिका

06:13 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आधार कार्ड नव्हे लग्नाची पत्रिका
Advertisement

सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. आगामी काळात विवाहाचे अनेक मुहूर्त असणार आहेत. या पार्श्वभूमीवर विवाहाची तयारी, परंपरा या गोष्टी समोर येतात. कुठल्याही विवाहात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना त्याचे निमंत्रण देणे असते. विवाहाच्या अनेक दिवसांपूर्वीच निमंत्रण पत्रिका छापली जाते. या निमंत्रण पत्रिकेत वधू वराविषयी, त्यांच्या कुटुंबांविषयी आणि विवाहसोहळ्याच्या तारखांविषयी सविस्तर माहिती नमूद असते. सध्या एक अशीच विवाह पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

लोकांनी आजवर अनेक विवाह पत्रिका पाहिल्या असतील. नातेवाईक, मित्रमंडळी, परिचितांना विवाहाचे निमंत्रण द्यावे लागते. काही पत्रिका खूपच साध्या असतात. तर काही पत्रिका अत्यंत हटक्या पद्धतीने तयार करण्यात येतात. अशाप्रकारच्या हटक्या पत्रिका तुम्ही पाहिल्या असतील. पण सध्या एक पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही विवाह पत्रिका पाहिल्यावर तुम्हालाही प्रारंभी ही खरंच विवाह निमंत्रण पत्रिका आहे की नाही यावर विश्वासच बसणार नाही.

एका व्यक्तीने आधार कार्ड थीमची विवाहपत्रिका छापली आहे. जी सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पत्रिकेत वधू वर, त्यांचे कुटुंब आणि विवाहाच्या विधीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही पत्रिका शेअर करण्यात आली असून त्याच्या कॅप्शनमध्ये ‘आधार कार्ड नाही तर लग्नाचे कार्ड आहे’ असे म्हटले गेले आहे.

Advertisement

या पत्रिकेवरील क्यूआर कोड युपीआयसारखा असायला हवा होता अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. आधार कार्ड लग्न असे दुसऱ्या युजरने नमूद पेले आहे. अनेक युजर्सना ही लग्न पत्रिका खूप आवडली आहे.

Advertisement
Tags :

.