आदर जैन-आलेखा अडवानीचा मेहंदी सोहळा
या सोहळयाला कपूर खानदानाची हजेरी
मुंबई
आदर जैन आलेखा अडवानी यांच्या लग्नाची धामधुम सुरू झाली आहे. लग्नाच्या मेहेंदीला कपूर खानदानाची सूनबाईंनी हजेरी लावली आहे.
आदर जैन आणि आलेखा अडवानी यांच्या लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला अभिनेता रणवीर कपूर, अभिनेत्री आलिया भट आणि आलिया भटची आई सोनी राजदान यांनी एकत्रित एन्ट्री घेतली. या सोहळ्याला आलियाने सोनेरी रंगाचा शरारा घातला होता. या शराऱ्याला मॅचिंग दुपट्टा आणि सुंदर असे कानातले घातल्याने, आलियाच्या रुपाला चार चांद लागले होते.
या मेहंदी सोहळ्याला आदर जैनच्या इंडस्ट्रीमधील अनेक भावंडांनी हजेरी लावली. याप्रसंगी अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांनीही उपस्थिती लावली होती. यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, रिधिमा कपूर सहानी आदींही या मेहंदी सोहळ्याला आले होते.
आदर आणि आलेखाने जानेवारी महिन्यात गोव्यामध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. याशिवाय त्यांचा रोका विधी नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती.
आदर जैन हा रिमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. आलेखा च्या आधी आदरचे तारा सुतारिया सोबत रिलेशन होते.