विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत आबा-हिंद स्पोर्ट्सची चमकदार कामगिरी
बेळगाव : जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने झालेल्या सिंधुदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत हर्षवर्धन कर्लेकरने एक कि.मी स्पर्धेत सुवर्ण, गाथा दड्डीकर 500 मीटर, गणीष्का यलजीने एक कि.मी व स्मरण मंगळूरकरने पाच कि.मी पल्लयात यांनी रौप्य पदके पटकाविली. सोयरा मन्नोळकर 1 कि.मी स्पर्धेत कांस्य, प्रणम्या प्रभूने पाचवा क्रमांक, रंजन कुलकर्णीने 2 कि.मी मध्ये चौथा क्रमांक, प्रसाद सायनेकर 3 कि.मी सहावा क्रमांक, मयुरेश जाधव 3 कि.मी नववा क्रमांक, प्राजक्ता प्रभू 3 कि.मी स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविले. वरील सर्वजण आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू असून त्यांना एन.आय एस प्रशिक्षक विश्वास पवार,अमित जाधव, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, विजय नाईक, सतीश धनुचे यांचे मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.