बांदा उपसरपंचपदी आबा धारगळकर बिनविरोध
12:49 PM Jan 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सौ. लीला मोर्ये यांनी माहिती दिली.पक्षीय धोरणानुसार उपसरपंच राजाराम सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंच पदी निवड ही बिनविरोध निश्चित झाली आहे. बांदा शहर ग्रामपंचायतवर भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपच्या पक्षीय धोरणनुसार तिसऱ्या वर्षी धारगळकर यांना संधी देण्यात आली आहे. दुपारी १ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची निवड जाहीर करणार आहेत.
Advertisement
Advertisement