कंटेनरच्या चाकाखाली चिरडून तरूण जागीच ठार
खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणाजवळील एका दुकानासमोर शुक्रवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील तऊणाचा जागीच मृत्यू झाला. शुभम शांताराम तांबट (22, वरवली-खेड) असे मृत तऊणाचे नाव आहे. अपघातग्रस्त कंटेनरने काही काळ वाहतूकही रोखून धरली.
सिमेंट वाहतुकीचा कंटेनर खेडहून चिपळूणच्या दिशेने जाण्यासाठी भरणेतील मध्यवर्ती ठिकाणाजवळील मार्गातून वळण घेत होता. याचवेळी दोघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. या दरम्यान दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. याचवेळी कंटेनरचे मागील चाक तऊणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे मध्यवर्ती ठिकाणाजवळील चारही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक झाली. अपघातामुळे भरणेतील मध्यवर्ती ठिकाणी वाहनचालकांसह पादचाऱ्यांची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवरच आली आहे.