Kolhapur | कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीत युवकाने भरदिवसा हॉटेलची केली तोडफोड; पोलिसांनी दाखवल्या खाक्या
06:00 PM Feb 17, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कोल्हापूरमध्ये रागाच्या भरात दगडफेक
Advertisement
कोल्हापूर - कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी भागात आज दुपारी स्वस्तिक हॉटेलवर एक तरुण भरदिवशी दगडफेक करून तोडफोड केली. हा तरुण संतप्त होता कारण त्याच्या आईला हॉटेल मालकाने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप त्याने केला. रागाच्या भरात त्याने हॉटेलच्या खिडक्यांना फोडले आणि परिसरात तुफान दगडफेक केली.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताबडतोब घटना स्थळी धाव घेत युवकाला भर चौकात अटक केली. त्याला खाक्या दाखवत ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. घटना पाहून परिसरात प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे रिलायन्स मॉल परिसरात तणाव निर्माण झाला आणि वाहतुकीला मोठी कोंडी झाली.
Advertisement
Advertisement