महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आतषबाजीच्या फटाके स्फोटात पामलदिन्नीतील युवक जागीच ठार

11:50 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यात्रेसाठी फटाके तयार करताना उडाला भडका

Advertisement

बेळगाव : आतषबाजीसाठी शोभेचे फटाके तयार करताना स्फोट होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील पामलदिन्नी येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली  आहे. मल्लाप्पा सत्याप्पा कंकणवाडी (वय 38) रा. पामलदिन्नी असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव असून त्याच्या मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला होता. स्फोटामुळे पत्र्याचे शेडही पूर्णपणे उडाले आहे. घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार नागपंचमीच्या वेळी पामलदिन्नी येथे आतषबाजी करण्याची परंपरा आहे. यासाठी दारुचे फटाके तयार करताना अचानक स्फोट होऊन मल्लाप्पाचा मृत्यू झाला. या घटनेत दोघे जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. शनिवारी रात्री घटप्रभा पोलिसांशी संपर्क साधला असता यासंबंधी एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. शेडला लागलेली आग विझवून जवानांनी शेडमध्ये प्रवेश केला असता मल्लाप्पाचा मृतदेह कोळसा झालेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी गर्दी जमली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article