महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंगळसूत्र पळविणाऱ्या कंग्राळ गल्लीतील युवकाला अटक

11:19 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी कंग्राळ गल्ली येथील एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सोमेश लक्ष्मण शंभुचे (वय 37 रा. कंग्राळ गल्ली) असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, श्रीमती एस. व्ही. बडिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी रात्री मार्केट यार्डजवळ ही घटना घडली होती. प्रीती परशराम नार्वेकर या गुरुवारी रात्री हंदिगनूर बसमधून मार्केट यार्डच्या गेटजवळ उतरल्या. तेथून चालत जाताना रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञाताने गळ्यातील 2 लाख 12 हजार 400 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केले होते.

Advertisement

पळविलेले मंगळसूत्र जप्त

Advertisement

ही घटना घडली त्यावेळी प्रीती यांची आई विमल, वहिनी मनीषा व मुलगाही त्यांच्यासोबत होता. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी सोमेश शंभुचे याला अटक करून त्याने पळविलेले मंगळसूत्र जप्त केले आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या पंधरवड्यात चेनस्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेचा तपास लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article