किरकोळ कारणातून तरूणाचा भोसकून खून! संशयित स्वत: पोलिसात हजर
जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी
हातगाडी लावण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत तऊणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. इम्रान इमामुद्दीन मुजावर (वय 32, रा. आराम कॉर्नर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. शहरात गणेश विसर्जनाची धामधुम सुऊ असतानाच आराम कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या खुनाची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून, खुनाच्या घटनेची माहिती घेतली. घटनेनंतर संशयित युसुफ हमीद अलमजीत उर्फ दाजी (वय 32, रा. आझाद चौक, कोल्हापूर) हा स्वत: बुधवारी पहाटे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
इम्रान मुजावरचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्यासह मित्रमंडळींनी समजताच त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. त्यामुळे सीपीआरच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.
इम्रान मुजावर हा शहरातील आराम कॉर्नर परिसरात कटलरी साहित्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानालगत संशयित युसुफ अलमजीत उर्फ दाजी यांच्या नातेवाईकांचे पर्स विकण्याचे दुकान आहे. सोमवार, 16 रोजी हातगाडी लावण्यावरुन इम्रान यांचा एका महिलेशी वाद झाला. याचा जाब विचारण्यासाठी संशयित युसुफने इम्रानला फोन कऊन कुठे आहेस, असे विचारत भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी इम्रानने त्याला आराम कॉर्नर परिसरात असलेल्या टिव्ही दुकानच्या दारात बसल्याचे सांगितले. यानंतर युसुफने तेथे जाऊन इम्रानला मिठ्ठी मारण्याचे नाटक कऊन, त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमी इम्रानला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्याचा काही वेळात मृत्यू झाला. याची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुऊ असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास युसुफ हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली.