For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : कोल्हापुरात मुलीची छेड काढल्याच्या समजातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

02:09 PM Dec 22, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात मुलीची छेड काढल्याच्या समजातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला
Advertisement

                                         रामानंदनगर येथील घटना : सहा जणांवर गुन्हा दाखल

Advertisement

कोल्हापूर : मुलगीची छेड काढल्याच्या गैरसमजातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यामध्ये नितीन विलास कुराडे (वय 33 रा. गुरुकृपा कॉलनी, रामानंदनगर) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कुमार दावणे, सुरज दावणे, अतुल दावणे यांच्यासह अन्य तिघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रामानंदनगर येथील जाधव पार्क परिसरात ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी नितीन कुराडे हा डॉग ट्रेनिंगचे काम करतो. शुक्रवारी 8 वाजण्याच्या सुमारास सुरज दावणे याने नितीन कुराडे यांना फोन करुन जाधव पार्क येथे बोलावून घेतले. नितीन व त्याचा भाचा अभिषेक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संशयितांनी नितीनला मारहाण करण्यास सुरुवात केली. कुमारने जाब विचारत लोखंडी रॉडने नितीनल मारहाण केली.

Advertisement

यामध्ये नितीन गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्यातून आणी उजव्या गालातून रक्त येऊ लागले. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला, यानंतर अभिषेकने नितीनला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

Advertisement
Tags :

.