Sangli Crime : सांगलीत दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला!
मिरज तालुक्यात कोयता हल्ल्याची घटना,
सांगली : दुचाकी मागितल्यावर न दिल्याच्या कारणावरुन मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. संदेश दीपक पांढरे (वय २२ रा. कसबेडिग्रज) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी नयन प्रविण पांढरे (वय २५, रा. वार्ड क्र. ६, कोळेवाडीनजीक, कसबे डिग्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दीपक शामराव पांढरे (रा. कसबे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाआहे.
फिर्यादी दीपक पांढरे यांचा मुलगा संदेश हा शनिवारी दुपारी दीड च्या सुमारास दुचाकीवरुन घरी येत होता. कसबेडिग्रज कमानीनजीक तो आला असता त्यास संशयित नयन पांढरे याने त्यास दुचाकी आडवी घालून थांबविले. काल मी दुचाकी मागितली असता तू का दिली नाहीस ? असा संदेश यास जाब विचारुन त्याच्याशी वाद घातला. तसेच त्याच्याकडे असलेला मारण्यासाठी उगारला. संदेश याने बचावासाठी हात पुढे केला असता त्याच्या डाव्या हातावर कोयता लागल्याने तो जखमी झाला.