For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुवर्ण मंदिरात युवकाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

06:18 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुवर्ण मंदिरात युवकाने स्वत वर झाडून घेतली गोळी
Advertisement

सुरक्षा रक्षकाकडून हिसकावून घेतली गन

Advertisement

वृत्तसंस्था/  अमृतसर

अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर परिसरात एका युवकाने स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. जखमी उपचाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून मृत युवकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवकाने मंदिर दर्शनासाठी पोहोचलेल्या एका व्हीआयपीच्या सुरक्षारक्षकाकडून गन हिसकावून घेतली होती.

Advertisement

व्हीआयपी लोक स्वत:च्या सुरक्षारक्षकांसोबत सुवर्ण मंदिरात नमन करण्यासाठी पोहोचले होते. व्हीआयपी लोक मंदिरात गेल्यावर त्यांचे सुरक्षारक्षक कॉरिडॉरमध्ये उभे होते. त्यादरम्यान तेथे एक युवक आला आणि त्याने सुरक्षारक्षकाची गन हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली.

मृत्यू झालेला युवक हा परप्रांतीय होता असा दावा पोलिसांनी केला आहे. हा युवक कुठून आला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.

Advertisement
Tags :

.