विवाह संस्थेत लग्न जमवू पाहणाऱ्या तरुणाची फसवणूक
संगमेश्वर :
विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जमविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संगमेश्वरातील तरुणाची 6 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आह़े विवाह संस्थेवरील तरुणीने लग्न करण्याचे मान्य करुन या तरुणाकडून पैसे उकळले. दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या तरुणाने संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा
तक्रारदार तरुणाने विवाह जमविण्यासाठी एका विवाह संस्थेवर नाव नोंदवले होत़े या ठिकाणी त्याला एका तऊणीचा बायोडाटा प्राप्त झाला होत़ा एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांनी फोनवर बोलण्यास सुऊवात केल़ी आरोपी तरुणी हिने आपण लग्न करुया, असे तक्रारदार यांना सांगितल़े यानंतर तिने 6 मार्च ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान तिच्या किरकोळ खर्चासाठी, अपेंडीस आजारावर ऑपरेशनसाठी व एमरॉयडरीचे मशीन खरेदासाठी वेळोवेळी तिने दिलेल्या मोबाईल नंबरवर 3 लाख 13 हजार 610 ऊपये जी पे केले तसेच फोन पे वरून एकूण ऊपये 3 लाख 49 हजार ऊपये असे एकूण 6 लाख 62 हजार 610 ऊपये घेतले. यानंतर संबंधित तऊणाशी संपर्क तोडून फसवणूक केली, अशी तक्रार दाखल करण्यात आली आह़े