महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

होन्निहाळजवळ खून झालेला तरुण श्रीनगरचा

10:40 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यरगट्टीहून बेळगावला येताना वाटेतच केला खून

Advertisement

बेळगाव : होन्निहाळजवळ खून झालेल्या अनोळखी युवकाची ओळख पटली असून तो श्रीनगर येथील राहणारा होता. व्यवसायाने तो कारचालक होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र या तरुणाचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. निंगनगौडा शिवनगौडा सन्नगौडर (वय 27, मूळचा रा. अलदकट्टी, ता. सौंदत्ती व सध्या रा. श्रीनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

18 नोव्हेंबर रोजी सकाळी सांबरा विमानतळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या होन्निहाळ येथील शेतवडीत निंगनगौडाचा मृतदेह आढळून आला होता. सिमेंटच्या विटांनी डोक्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. होन्निहाळ येथे आढळून आलेल्या मृतदेहाची छायाचित्रे सर्व पोलीस स्थानकांना पाठविण्यात आली होती. सोमवारी रात्री श्रीनगर येथील निंगनगौडाचे कुटुंबीय तो बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी माळमारुती पोलीस स्थानकात पोहोचले. त्यावेळी माळमारुती पोलिसांनी होन्निहाळ येथे आढळलेल्या मृतदेहाची छायाचित्रे कुटुंबीयांना दाखविली. त्यामुळे त्याची ओळख पटली.

‘तो’ बेळगावला पोहोचलाच नाही

निंगनगौडा व्यवसायाने कारचालक होता. रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी आपण काम करीत असलेल्या मालकांना देवदर्शनासाठी कारमधून त्याने सौंदत्तीला नेले होते. सौंदत्तीहून बेळगावला येताना दुपारी यरगट्टी येथे निंगनगौडा कारमधून उतरला. यरगट्टीहून जवळच असलेल्या अलदकट्टी या आपल्या गावी जाऊन येण्याचे सांगितले होते. गावात कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर बेळगावला येण्यासाठी त्याने यरगट्टी येथे बस पकडली होती. मात्र तो बेळगावला पोहोचला नाही. होन्निहाळजवळ दुसऱ्या दिवशी सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. मारिहाळ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article