For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबोली - नांगरतास येथील अपघातात पुण्याचा तरुण जागीच ठार

11:06 AM Feb 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आंबोली   नांगरतास येथील अपघातात पुण्याचा तरुण जागीच ठार
Advertisement

वार्ताहर/ आंबोली

Advertisement

वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला दुचाकी आदळून पुणे - काळेवाडी येथील दुचाकीस्वार आनंद गणेश केंगार (२३) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली नांगरतास आराध्य हॉटेल जवळ घडली. गोवा येथून पर्यटन सफर आटोपून ते पुणे येथे जात असताना हा अपघात घडला. अपघाताची खबर टेम्पो चालक संतोष परशुराम राजनवर (३९) रा. सांगली रोड, संकेश्वर यांनी आंबोली पोलीसात दिली. अपघाताची खबर मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार संतोष गलोले, हवालदार रामदास जाधव, हवालदार मनिष शिंदे यांनी घटना स्थळी जात मयत आनंदचा मृतदेह १०८ रुग्णवाहिकेने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.मयत आनंद गणेश केंगार आणि त्याचे सहा जण मित्र गोवा येथून पुणे येथे जात असताना वाटेत नांगरतास येथील आराध्य हॉटेल जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोवर आदळून आनंद हा जागीच ठार झाला.  मित्र पुढे निघून गेल्याने लवकर पोहोचण्याच्या नादात हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातात त्याच्या मेंदूला जबरजस्त मार लागला मेंदूतून रक्तस्त्राव झाला. आनंद याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.हा अपघात एवढा भयंकर होता की आयशर टेम्पोचे पुढील चाक पंक्चर झाले.अपघातचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.