For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangameshwar | संगमेश्वरमध्ये कोल्हापुरातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

03:33 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangameshwar   संगमेश्वरमध्ये कोल्हापुरातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
Advertisement

                             कोल्हापूरच्या राजारामपुरीतील तरुणाचा कोकणात दुर्दैवी अंत

Advertisement

संगमेश्वर -कोल्हापूरहून कोकण पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा तालुक्यातील सोनवी संगमेश्वर नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजय शंकर बोरगे (वय ३७ रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय बोरगे हे आपले मावस भाऊ विनोद मोहन कल्कुटकी आणि इतर मित्रांसह कारने संगमेश्वर येथील मित्र सागरच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. नदीकाठी गेल्यानंतर सर्व मित्रांनी जेवणाची जय्यत तयारी केली होती. एका बाजूला जेवण तयार होईपर्यंत नदीत पोहण्याचा आनंद घेऊ या विचाराने सर्वजण पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने अजय बोरगे नदीच्या पात्रात खोलवर बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांना पाण्याबाहेर काढूनतातडीने संगमेश्वर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Advertisement

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे हलवण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून अजित यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनोद कलकुटकी यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एस. गावीत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.