For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | शेतात दबा धरून बसलेल्या 'त्या', साहिलला काही कळायच्या आतच होत्याचे नव्हते झाले!

12:05 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   शेतात दबा धरून बसलेल्या  त्या   साहिलला काही कळायच्या आतच होत्याचे नव्हते झाले
Advertisement

                                 हलकर्णीतील साहिल पुजारीची मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

Advertisement

कोल्हापूर : मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साहिल भिमा पुजारी (वय २२ स. हलकर्णी ता गडहिंग्लज) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहिल हा सोमवार ४ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घराशेजारील शेतात गेला असता अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.

त्यालाउपचारासाठी हलकर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पुढील उपचारासाठी मंगळवारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले मात्र मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या आहे. साहिलच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. उदरनिर्वाहासाठी शेतातच राहायला आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.