Kolhapur News | कोल्हापुरातील वडणगे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
करवीर तालुक्यात 21 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापुर- राहत्या घरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे वडणगे (ता, करवीर ) येथे उघडकीस आली आहे. राज दिपक कांबळे (वय21 मुळरा.कदमवाडी,ता.करवीर) असे मृताचे नाव आहे.
कु़्टुंबियांनी गळफास सोडवुन त्याला सी पी आर रुग्णालयात दाखल केलेय तिथे उपचारापुर्वी त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राज कांबळे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो फॅब्रिशनची कामे करीत होता. गेल्या काही दिवसापासुन तो शांत होता. मात्र याबाबत त्याने कोणाला काही सांगितले नाही, शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर तो घरात झोपला होता. सकाळी 9 वाजले तरी त्याने खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने भाऊ प्रेम याने त्याला उठवण्यासाठी खोलीत जाऊन पाहीले तर राजने नायलॉन दोरीने छताच्या अॅगलला गळफास लाऊन घेतला होता.
हे पाहून प्रेम मोठ्याने ओरडला. तेव्हा घरातील व शेतातील जमले. तातडीने लोकांनी खाजगी वाहनाने राजला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केल. याबाबत करवीर पोलीसांना कळवल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला . मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला.