For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हातकणंगले तालुक्यातील रुई येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

04:02 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
हातकणंगले तालुक्यातील रुई येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  परिसरात हळहळ
Advertisement

                                  हातकणंगलेत आत्महत्येची घटना

Advertisement

हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथील तरुणाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली. अभय आण्णा कमलाकर वय ३८ असे मृताचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, अभय हा घरी पत्नी व मुलगी यांचसोबत राहत होता. काही दिवसांपासून पत्नी आपल्या मुलगीसोबत माहेरी गेल्या होत्या.

शुक्रवार सकाळपासून आपल्या भावाचा व मित्रांचा फोन उचलतनसल्याने काही मित्रांनी घरी जाऊन चौकशी केली असता घराला आतून कड़ी होती पण दरवाजा कोणी उघडत नव्हता त्यामुळे काही मित्रांनी घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून बघितले असता अभयने आपल्या बेडरुममध्ये फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

ही माहिती समजताच त्यांनी पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घडलेल्या घटनेची कल्पना दिली. माहिती समजताच तराळ हे घटनास्थळीदाखल होऊन तत्काळ हातकणंगले पोलिसांना पंचनाम्यासाठी बोलावून घेतले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद पिलानी यांनी घटनास्थळाची पाहणी करत आजूबाजूला चौकशी केली असता अभयने घरी कोणी नसल्याचे बघून गुरुवारी रात्रीच आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags :

.