आ. यड्रावकर जात-पात बाजूला ठेवून प्रत्येकाच्या सेवेसाठी उभे
कोल्हापूर :
लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दाखवून दिला आहे. त्यांनी जातीपातीच्या भिंती पाडून शिरोळ तालुक्यात विकासाचं मंदिर उभं केलं आहे. यामुळे येत्या निवडणुकीत ‘शिट्टी‘ चिन्हावर मतदान करून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी दानोळी येथे सभा झाली.
यावेळी माने म्हणाले, यड्रावकर यांनी संयम आणि कार्यतत्परतेने शिरोळ तालुक्याचा चेहरा बदलला आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि स्व. दत्ताजीराव कदम यांच्या विचारांचा वारसा त्यांनी जोपासला आहे. जात-पात बाजूला ठेवून ते प्रत्येकाच्या सेवेसाठी उभे आहेत.
सभेपूर्वी धर्मवीर चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे क्षितिज दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. स्वागत अरुण होगले यांनी केले.
माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना माने म्हणाले, आमचा आमदार हा तालुक्याला दत्तक घेऊन विकासाचे काम करतो. यड्रावकर यांनी शेतक्रयांना स्वखर्चातून कर्ज देण्याऐवजी शासनाच्या योजनांमधून अनुदान देऊन नापीक जमीन सुपीक केली आहे, जे स्वागतार्ह आहे. विरोधकांनी त्यांच्या व्हिजनची स्पष्टता द्यावी. विरोधकांच्या टीकेसाठी आम्ही सज्ज आहोत, मात्र वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही.
आमदार यड्रावकर यांनी सांगितले की, शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उदगाव येथे मेडिकल हब उभारण्यात येत आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या सभेला सतिश मलमे, प्रमोददादा पाटील, चंद्रकांत मोरे, संजय देसाई, उदय झुटाळ, राकेश खोद्रे, सरपंच सुनीता वाळकुंजे, बापूसो दळवी, गुंडू दळवी, केशव राऊत, धन्यकुमार पाराज, विकास वाळकुंजे, अनिल कांबळे, सिताराम माने, बादशहा तांबोळी, संजय माने, विलास काटकर यांच्यासह पंचक्रोशीतील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि गावातील ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते.