For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल यांच्याकडून चुकीची कबुली

06:02 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल यांच्याकडून चुकीची कबुली
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

मानहानीकारक असा एक व्हिडीओ आपल्याकडून चुकीने रीट्विट करण्यात आला अशी कबुली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. त्यांनी या चुकीसाठी क्षमायाचनाही केली आहे. हा व्हिडीओ ध्रूव राठी नामक एका युट्यूब चालकाने 2018 मध्ये पोस्ट केला होता. तो केजरीवाल यांनी रीट्विट केला होता. न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावाणी सोमवारी करण्यात आली.

ध्रूव राठी यांनी 2018 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षासंबंधी एक अवमानजनक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरण गुदरण्यात आले होते. कनिष्ठ न्यायालयाने या संदर्भात त्यांच्याविरोधात नोटीसही देण्यात आली होती. केजरीवाल यांनी हा व्हिडीओ रीट्विट केल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेची सुनावणी सध्या केली जात आहे. या प्रकरणातील तक्रार विकास संक्रितयान यांनी सादर केली असून राठी यांच्या व्हिडीओमुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. आता केजरीवाल यांनी क्षमायाचना केल्याने हे प्रकरण मिटविण्याची इच्छा आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने तक्रारदाराला विचारला आहे. हे प्रकरण पुढेही सुरु राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.